Ad will apear here
Next
स्वस्थ भारत यात्रेतील सायकलस्वार १० तारखेला ठाण्यात
ठाणे : ‘नवी दिल्ली येथील केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांच्या विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या स्वस्थ भारत यात्रेचे सायकलस्वार १० नोव्हेंबर २०१८ रोजी ठाण्यात येत असून, सकाळी ११ वाजता टिप टॉप प्लाझा येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर त्यांचे स्वागत करतील,’ अशी माहिती कोकण विभाग सहआयुक्त (अन्न व औषध प्रशासन) शिवाजी देसाई यांनी दिली.

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून जनतेत सुरक्षित, समतोल व पौष्टिक आहाराबाबत जनजागृती करण्यासाठी ‘स्वस्थ भारत यात्रा’ ही मोहीम १६ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. या यात्रेत साडेसात हजारांहून अधिक सायकलस्वार सहभागी झाले असून, ते ‘आहारात मीठ, साखर, तेल थोडे कमी वापरा’ असा संदेश देत आहेत.

‘या यात्रेला सर्व ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. ठाण्यातही शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसह संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून यात्रेला प्रोत्साहन द्यावे व कमी खाण्याचा संदेश पोहोचवावा,’ असे आवाहन देसाई यांनी केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZWWBU
Similar Posts
भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्ता होणार सहा पदरी ठाणे : ‘भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या सहा पदरी रुंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आणि पायाभरणी ३० डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. पलावा जंक्शन देसाई गाव येथे उड्डाणपुलाची पायाभरणी होईल. त्यानंतर चार वाजता पत्रीपूल येथे रुंदीकरण
मुरबाडच्या म्हसा यात्रेत पशुप्रदर्शन ठाणे : जिल्ह्यात पशुपालन व्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने या वर्षी म्हसा यात्रेचे औचित्य साधून एक दिवसाचे भव्य जिल्हास्तरीय पशु-पक्षी प्रदर्शन २१ जानेवारी २०१९ रोजी आयोजित केले आहे. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे प्रदर्शन भरेल
आयलीफ रिट्झ बँक्वेट्सचे उदघाटन ठाणे : दिमाखदार लग्नसोहळा किंवा शानदार इव्हेंट करण्यासाठी खिशात खूप पैसे असायलाच हवेत,   असे काही नाही. ठाण्यातील घोडबंदर रोड येथील आर-मॉलमध्ये नव्यानेच सुरू झालेल्या ‘आयलीफ रिट्झ बँक्वेट्स’ने गुणवत्ता, लक्झरी आणि किफायतशीरपणा यांचा अनोखा संगम साधला आहे. शानदार समारंभांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधांनी
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीला उजाळा ठाणे : राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये नुकतेच २९व्या सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते झाले. या संमेलनाच्या निमित्त्ताने अनेक कार्यक्रमांमधून सावरकरांच्या स्मृतीला उजाळा दिला गेला. या संमेलनाला ठाण्याचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language